गाड्यांचा फिटर नव्हे वाहनचोर, ७ गाड्या जप्त

गाड्यांचा फिटर नव्हे वाहनचोर, ७ गाड्या जप्त

दुरूस्तीसाठी आलेल्या वाहनांची करीत होता विक्री

marathinews24.com

पुणे – दुरूस्तीसाठी आलेल्या चारचाकी वाहनांची परस्पररित्या विक्री करून आर्थिंक अपहार करणार्‍या फिटरला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ५२ लाख रूपयांच्या ७ मोटारी जप्त केल्या आहेत. फिटर भुषण उत्तम काळे (वय ३५ रा. घर नं. ७, नवीन वसाहत, कात्रज गावठाण) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

बसमध्ये तरुणाची सोन्याची चेन चोरणाऱ्या दोघांना बेड्या – सविस्तर बातमी 

तक्रारदाराने ६ ऑगस्टला त्यांची अलिशान मोटार सर्व्हिसह दुरूस्तीसाठी फिटर भुषण काळे याच्या गॅरेजमध्ये उभी केली. मात्र, फिटर काळेने परस्पर मोटारीचा व्यवहार करून सांगोला तालुक्यातील एजंट समीर मुबारक अत्तार याच्यासोबत मध्यस्थी केली. त्याला कमीशन देउन संबंधित मोटार कवठेमहाकाळ(जि. सांगली) येथील एजंट आरिफ आमीन मुजावर याला उसनवार पैशांची नोटरी करून ८ लाखांना विक्री केली होती. याप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पथकाने आरोपी काळेला २१ ऑगस्टला अटक केले. न्यायालयाने त्याला २६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

पोलीस तपासादरम्यान संबंधिताने अनेक वाहनांची परस्पर विक्री केल्याचे उघडकीस आले. त्याच्याकडून ५२ लाखांच्या सात मोटारी जप्त केल्या आहेत. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे करीत आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त संजय बनसोडे, उपायुक्त मिलींद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस निरीक्षक गजानन चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुरेश शिंदे, हवालदार रविंद्र चिप्पा, आकाश फासगे, राहूल लवटे, सुभाष मोरे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×