Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

भवानी पेठेत वाहनांची तोडफोड, आरोपींना बेड्या

पिस्टलासह काडतुस बाळगणारा सराईत जेरबंद

पाच जणांसह अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भवानी पेठेत वाहनांची तोडफोड, आरोपींना बेड्या – दहशत माजवून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी समर्थ पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल केला. भवानी पेठेतील मंजुळाबाई चाळीत टोळक्याने तोडफोड केली होती. याप्रकरणी जयेश सिद्धार्थ सोनवणे (वय २१), रितेश सिद्धार्थ सोनवणे (वय २३, दोघे रा. एसआरए वसाहत, मंजुळाबाई चाळ, भवानी पेठ) यांना अटक केली आहे. पाच जणांसह अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत एकाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात एकाच दिवसांत दोन खूनाच्या घटनेने खळबळ – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे मंजुळाबाई चाळ परिसरातील एसआरए वसाहतीत राहायला आहेत. १८ जुलैला मंजुळबाई चाळीत रात्री साडेदहाच्या सुमारास टोळक्याने दहशत माजविली. आरोपी सोनवणे आणि साथीदारांनी नागरिकांना शिवीगाळ केली. एसआरए वसाहतीच्या तळमजल्यावर लावलेल्या दुचाकी, रिक्षाची दांडक्याने तोडफोड केली. वसाहतीतील महिलांनी आरोपी सोनवणे आणि साथीदारांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपी्ंनी वसाहतीतील महिलांना शिवीगाळ करुन मारहाणीची धमकी दिली. परिसरात दहशत माजवून पसार झालेल्या आरोपी सोनवणे यांना अटक केली. पसार झालेल्या साथीदारांचा शोध सूरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते, पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×