परशुराम वाडेकर यांच्या उपमहापौर निवडीचे स्वागत

परशुराम वाडेकर यांच्या उपमहापौर निवडीचे स्वागत

आंदोलकाला उपमहापौर केल्याबद्दल आठवले व फडणवीस यांचे आभार : बाळासाहेब जानराव

marathinews24.com

पुणे – पुणे महानगरपालिकेच्या उपमहापौरपदी रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्यकारिणीचे संघटक सचिव परशुराम वाडेकर यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे तसेच सभागृह नेते गणेश बिडकर यांचे रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव यांनी विशेष पत्राद्वारे अभिनंदन व आभार व्यक्त केले आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी – सविस्तर बातमी 

परशुराम वाडेकर यांच्या उपमहापौरपदी निवडीबद्दल बाळासाहेब जानराव यांच्यासह माजी उपमहापौर सुनिताताई वाडेकर, नगरसेविका हिमाली कांबळे, नगरसेवक निलेश आल्हाट, नगरसेविका निशा मानवतकर, पुणे शहराध्यक्ष संजय सोनवणे, महिपाल वाघमारे, शाम सदाफुले, जयदेव रंधवे, संगीताताई आठवले, उमेश कांबळे, संदीप धांडोरे, गणेश जगताप आदी पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

यावेळी बोलताना बाळासाहेब जानराव म्हणाले की, “परशुराम वाडेकर यांचा ३५ वर्षांहून अधिक कालावधीचा सामाजिक व राजकीय संघर्ष लक्षात घेता, सर्वसामान्य आंदोलक ते पुण्यनगरीचे उपमहापौर असा त्यांचा प्रवास अत्यंत अभिमानास्पद आहे. त्यांच्या या यशाबद्दल विशेष अभिनंदन.”

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×