पतीविरूद्ध लष्कर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
marathinews24
मराठीन्यूज २४ पुणे: पत्नीसह तिच्या लाडक्या कुत्र्याला विदेशात घेउन जाण्याचे आश्वासन पतीने लग्नानंतरही पाळले नाही. त्याच रागातून पत्नीने थेट पुण्यातील लष्कर पोलीस ठाणे गाठून नवर्याविरूद्ध तक्रार अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे लग्नापुर्वी दिलेले आश्वासन न पाळलेले पतीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ही घटना २६ डिसेंबर २०२४ ते २७ मार्च २०२५ कालावधीत कॅम्पमध्ये घडली आहे.
पुण्यातील कॅम्प परिसरात रहाणार्या तरुणाने लग्नापुर्वी तीन महिने आधी पत्नीसह तिच्या लाडक्या कुत्र्याला जर्मनीत नेणार असल्याचे सांगितले. मात्र, लग्नानंतर त्याने विवाह नोंदणी कार्यालयात चुकीचा पत्ता दिला. जेणेकरून पत्नीसह श्वानाच्या व्हिसासाठी जाणूनबुजून उशीर व्हावा यासाठी त्याने प्लॅनिंग केले. चुकीचा पत्ता रजिस्ट्रर केल्यामुळे वेळेत व्हिजा न मिळालयाने पत्नीला तिच्या लाडक्या कुत्र्यासोबत विदेशात जाता आले नाही. त्याच रागातून ३२ वर्षीय महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात धाव घेत पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ८५, ३१८ (३), ११५ (२) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
मामानेच भाच्याचा केला खून- सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती व पत्नी उच्चशिक्षित असून तक्रारदार महिलेचा पती खासगी कंपनीत नोकरीला आहे. लग्नापुर्वी पतीने तिला लाडक्या कुत्र्यासह जर्मनीला घेउन जाण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, लग्न केल्यानंतर त्याने पत्नीचा व्हीजा येण्यास उशीर व्हावा यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात चुकीचा पत्ता दिला. त्यामुळे नोंदणी कार्यालयातून कागदपत्रे वेळेत पत्त्यावर पोहोचली नाहीत. व्हिजा वेळेत आला नसल्यामुळे पत्नी संतापली. त्यामुळे रागावलेल्या पतीने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन वारंवार भांडण केले. तसेच त्याने स्वतःच्या आर्थिक परिस्थितीबद्दल खोटे सांगून महिलेची फसवणूक केली. तिला जर्मनीला न नेता फसवणुक केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक एस भराड पुढील तपास करत आहे.