Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

पुणेकरांसाठी मेहनतीने काम करत राहणार – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुणेकरांसाठी मेहनतीने काम करत राहणार - पोलीस आयुक्त अमितेश कुमार

पुण्यात ४१ व्या परिक्षेत्र क्रीडा स्पर्धेचा समारोप

marathinews24.com

पुणे – शहरातील कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने पोलीस आतापर्यंत दलाने चांगली कामगिरी केली आहे. आगामी काळातही पुणेकरांसाठी आम्ही मेहनत आणि जबाबदारीने काम करत राहणार आहोत. विशेषतःआमची कार्यशक्ती वाढवण्यासाठी शासनाने आम्हाला पूर्ण मदत केली आहे. आमच्या मागणीनुसार नवीन पोलीस ठाण्यांसह परिमंडळाला मंजुरी दिली आहे. त्यासोबतच अतिरिक्त मनुष्यबळही उपलब्ध केले आहे, त्यामुळे आमची आणखी जबाबदारी वाढली असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे.

नवले पुलावरील अपघातांच्या मालिकेला अखेर पूर्णविराम! – सविस्तर बातमी 

४१ वी पुणे शहर व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र क्रीडा स्पर्धा शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त संजय पाटील, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, अपर पोलीस आयुक्त बसवराज तेली, उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त निखील पिंगळे, उपायुक्त मिलींद मोहिते, उपायुक्त संभाजी कदम, उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी अनुराधा उदमले, एसीपी नंदा वग्याणी उपस्थित होत्या.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, पुणे शहर पोलीस दलाने मागील पावणेदोन वर्षांत अत्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावर्षी शासनाने रेकॉर्डब्रेक एकाच वर्षात १२ पोलीस ठाणे, २ पोलीस उपायुक्त, २ हजार अमलदारांचे मनुष्यबळ उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे आता संबंधित पोलीस ठाण्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे. पुणे पोलीस दलाच्या मागणीनुसार शासनाने वेळेआधीच पुर्तता केल्यामुळे आम्ही आभार मानतो. दरम्यान, मागील अनेक गंभीर गुन्ह्यासह विविध घटनांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. पुणे स्पर्धा उत्कृष्ठ पणे पार पाडण्यासाठी सर्वांनी मेहनत घेतली आहे. आगामी पोलीस गेम्समध्ये यावर्षी खेळाडून चांगली कामगिरी करतील. त्यासाठी आपण मेहनतीने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा म्हणाले, स्पर्धेतील खेळ भावनांनी आपल्याला सर्वांना एकत्रित आणले आहे. त्याचा फायदा आगामी पोलीस स्पर्धेत होणार असूनर, सर्व खेळाडूंनी आतापासूनच तयारी करावी. खेळामुळे आपला फिटनेस वाढण्यासाठी मदत होते. त्यामुळे ताणतणाव कमी होण्यास मदत होते. त्यामुळे खेळाला अन्यन्य साधारण महत्व असून, संघभावनेने खेळल्याने आणखी स्पर्धा चांगली होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूकीसाठी पोलीस दल सज्ज

महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी पुणे पोलीस दल सज्ज झाले आहे. निवडणूकीत जबाबदारीने काम करण्यासाठी पोलीस आतापासून कामाला लागले आहे. प्रामुख्याने कायदा सुव्यवस्थेसह निवडणूक चांगल्या पद्धतीने पार पाडण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहेत असेही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×