Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

गावठी दारू तयार करणारी महिला अटकेत

अरण्येश्वरमध्ये तरूणावर वार, एकाला अटक

गावठी दारू, रसायनासह ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

marathinews24.com

पुणे – नगर रस्ता परिसरातील भावडी गावात बेकायदा गावठी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर गुन्हे शाखेेने छापा टाकला. गावठी दारू तयार करुन विक्री करणाऱ्या एका महिलेला अटक करण्यात आली. या कारवाईत पोलिसांनी गावठी दारू, तुरटी, तसेच गावठी दारु तयार करण्यासाठी लागणारे रसायन असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

वाघोलीत एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक – सविस्तर बातमी

अनिशा योगेश गुडदावत (वय २०, रा. भावडी, ता. हवेली, नगर रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. नगर रस्त्यावरील भावडी गावातील मोकळ्या जागेत एक महिला गावठी दारू तयार करुन विक्री करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सातमधील पोलीस कर्मचारी नितीन धाडगे आणि प्रतिक्षा पानसरे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने गावठी दारू तयार करणाऱ्या भट्टीवर छापा टाकला. या कारवाईत १८ लिटर तुरटी मिश्रित पाणी, गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन, अन्य साहित्य असा सहा लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हातभट्टी तयार करणारी महिला अनिशा गुडदावत हिला ताब्यात घेण्यात आले.

तिच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली. सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, नेहा तापकीर, सोनाली नरवडे, ऋषीकेश ताकवणे, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×