Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

वाघोलीत एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

वाघोलीत एमडी तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

२८ लाखाचे एमडी, मोटारीसह ५५ लाखांचा ऐवज जप्त

marathinews24.com

पुणे – मेफेड्रोन विक्रीच्या तयारीत असलेल्या दोन तस्करांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २८ लाखांचे एमडी, मोटार मोबाईल असा ५५ लाखांहून अधिक माल जप्त केला आहे. अटकेतील दोघेही तस्कर गेल्या वर्षभरापासून ड्रग्ज पुरवठा करत असल्याचे उघडकीस आले आहे. किशन नंदकिशोर लधड (वय ३५, रा. धानोरी) हनुमान रूपाराम चौधरी (वय ३३, रा. वडगाव मावळ) अशी अटक केलेल्याची नावे आहेत. याप्रकरणी वाघोली पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.

उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न – सविस्तर बातमी 

केसनंद परिसरात ड्रग्ज बाळगणाऱ्या किशन लधड याला अटक केली होती. वाघोली परिसरात सुरु असलेली ड्रग्ज तस्करीचा पर्दापाश केला. तपासी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांनी लधडकडे केलेल्या तपासात त्याने हनुमान चौधरी याच्याकडून ड्रग्ज खरेदी केल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने चौधरीला ताब्यात घेतले. त्यानुसार पथकाने चौधरीला वडगाव मावळ भागातून सापळा रचून पकडले.

आरोपी चौधरीकडील गाडीत तब्बल २८ लाख रुपयांचा १३४ ग्रॅम एमडी जप्त केले. तो मूळचा राज्यस्थानातील असून, तेथून ड्रग्ज आणून पुण्यात विक्री करत असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोजकुमार पाटील, उपायुक्त सोमय मुंडे, एसीपी नुतन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकिशोर गायकवाड, पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर, एपीआय विजय चंदन, उपनिरीक्षक अमोल काळे, प्रदीप मोरे, शेखर शिंदे, विशाल गायकवाड, मारुती वाघमारे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×