Breking News
शाहू छत्रपतींचा विचारवारसा कृतीतून पुढे न्यावा – डॉ. श्रीपाल सबनीसपुलंसारखा निखळ, निरामय विनोद निर्माण करणारा कलाकार विरळच – शमा भाटेप्रितम मुंडेंनी घेतली घुले कुटुंबियांची भेट; कुटुंबियांना अश्रू अनावरपुण्यातील कॅफेत दोघांनी रचला कट, व्हिडिओ व्हायरलदुचाकी वाहन चोरी करणारा चोरटा अटकेत – ४ गुन्हे उघडकीसआरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सारथीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळामहाराष्ट्राच्या १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने संरक्षण उत्पादनाचा मोलाचा वाटामहाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय – विशेष लेख साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाच्या थेटकर्ज योजनेची लाभार्थी निवड १ जुलै रोजी

उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न

गाडी चालकावरून झाला वाद; डोक्यात घातला दगड

 फरार आरोपी अटकेत

marathinews24.com

पुणे – उपाहारगृह चालकाच्या मुलाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गेले दीड वर्ष पोलिसांना गुंगारा देणाऱ्या सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. फैसल उर्फ बटाव उस्मान खान (वय ४२, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. येरवडा भागातील चायनीज खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या उपाहारगृह चालकाच्या मुलावर खानने तीक्ष्ण शस्त्राने वार करुन गल्ल्यातील रोकड लुटली हाेती. याप्रकरणी दीड वर्षांपूर्वी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुटखा-पानमसाला विरोधात कारवाई ९२ लाखांचा साठा जप्त – सविस्तर बातमी 

गुन्हा केल्यानंतर आरोपी खान पसार झाला होता. तेव्हा पासून त्याचा पोलीस शोध घेत होते. आरोपी खान हा भवानी पेठेतील कासेवाडी भागात थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारमधील पोलीस कर्मचारी नागेश कुंवर, विशाल इथापे यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, उपनिरीक्षक वैभव मगदुम, सहायक फौजदार एकनाथ जोशी, अमजद शेख, तुषार खराडे, शरद झांजरे यांनी ही कारवाई केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×