Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

‘म्हाडा’त सदनिकेत मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

‘म्हाडा’त सदनिकेत मिळवून देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक

कोंढवा पोलिसांकडून एका विरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महाराष्ट्र गृहनिर्माण मंडळाकडून (म्हाडा) वितरित करण्यात येणारी सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाने महिलेची एक लाख २० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांकडून एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, श्रीकृष्ण वसंतराव तौर उर्फ बाळाराजे पाटील (रा. अरणगाव,, ता. परांडा, जि. धाराशिव ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परदेशी चलन व्यवहारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४० लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३७ वर्षीय महिला पिंपरी चिंचवडमधील रहाटणी परिसरात राहायला आहे. फिर्यादी महिला आणि तिच्या पतीची आरोपीशी ओळख झाली. आरोपीने महिला आणि तिच्या पतीला म्हाडात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार महिला आणि तिच्या पतीला कोढवा भागातील एका इमारतीजवळ बोलाविले. सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून एक लाख २० हजार रुपये घेतले. पैसे घेतल्यानंतर महिलेने सदनिकेबाबत विचारणा केली. तेव्हा आरोपीने टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×