Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

सासवड रस्त्यावर महिलेचा खून

विश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खून

अनोळखी महिलेची ओळख पटविण्याचे काम सुरू

marathinews24.com

पुणे – शहरातील हडपसर-सासवड रस्त्यावर वडकी गावात असलेल्या गोदामाच्या मोकळ्या जागेत महिला मृतावस्थेत सापडली. महिलेचा खून झाल्याचे उघड झाले असून, महिलेची ओळख पटलेली नाही. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे (वय ४३) यांनी फुरसुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातून दुचाकी चोरणारे गजाआड – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर-सासवड रस्त्यावरील वडकी गावातील काची कंपनीच्या गोदामाजवळ असलेल्या मोकळ्या जागेत एक महिला मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सहायक निरीक्षक पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. महिलेच्या डोक्यात कठीण वस्तुने प्रहार करण्यात आल्याचे उघडकीस आले. उपचारांपूर्वीच महिलेचा मृत्यू झाला होता. खून झालेल्या महिलेचे वय अंदाजे ३० ते ३५ वर्ष आहे. तिची ओळख पटलेली नाही. पोलिसांकडून महिलेची ओळख पटलेली नाही. हडपसर, सासवड, फुरसुंगी परिसरातून बेपत्ता झालेल्या महिलांची पोलिसांकडून माहिती घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×