Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

पुण्यात प्रेम संबंधातून महिलेचा खून, वकिलासह तिघे अटकेत

पाेत्यात मृतदेह ठेऊन पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

marathinews24.com

पुणे – अनैतिक संबंधातून महिलेला बॅटने मारहाण करुन तिचा खून केल्याची धक्कादायक घटना चंदननगर भागात घडली. याप्रकरणी एका वकिलासह, त्याची पत्नी आणि मुलीला अटक करण्यात आली आहे. पूनम दिनेश मुन (वय ३२, रा. गणेशनगर, येरवडा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. ‘याप्रकरणी वकील ॲड. संजय सावंत, त्यांची पत्नी स्वाती आणि मुलीला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध चंदननगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पूनमचे पती दिनेश यांनी फिर्याद दिली आहे’, अशी माहिती चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी दिली.

जेष्ठाला ट्रेडींगमध्ये गुुंतवणूकीचे आमिष पडले ३३ लाखांना – सविस्तर बातमी

ॲड. सावंतचे पूनमशी प्रेमसंबंध होते. ॲड. सावंत याचे चंदननगर भागातील जुन्या मुंढवा रस्त्यावर कार्यालय आहे. पूनम गेल्या साडेतीन वर्षांपासून ॲड. सावंत याच्या कार्यालयात सहायक म्हणून काम करत होती. गुरुवारी (१६ एप्रिल) सकाळी ती नेहमीप्रमाणे ॲड. सावंतच्या कार्यालयात गेले. त्यानंतर ॲड. सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि मुलीने तिला बॅटने मारहाण केली. तिच्यावर शस्त्राने वार केले. त्यानंतर तिचा मृतदेह पोत्यात ठेवण्यात आला. रात्री आठपर्यंत पूनम घरी न परतल्याने तिच्या पतीने ॲड. सावंत यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा पूनम मैत्रिणीकडे गेल्याचे सांगण्यात आले. पतीने तिच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. मात्र, मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर पूनमचे पती शुक्रवारी सकाळी ॲड. सावंत यांच्या कार्यालयात गेले. तेव्हा कार्यालयाचा दरवाजा उघडा होता. पूनम रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिचा मृतदेह ठेवण्यात आला होता. त्यानंतर पूनमच्या पतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक, नूतन पवार, पोलीस निरीक्षक निलेश बडाख यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. चंदननगर पोलिसांनी ॲड. सावंत आणि त्यांच्या मुलीला ताब्यात घेतले, तसेच गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने ॲड. सावंत यांची पत्नी स्वाती हिला ताब्यात घेतले. खून प्रकरण उघडकीस आल्यानंतर सहा तासात गुन्ह्याचा छडा लावला. पोलीस निरीक्षक बडाख, खंडणी विरोधी पथकाचे पाेलीस निरीक्षक राम राजमाने आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×