Breking News
पत्नीच गळा दाबुन जीवे मारण्याचा प्रयत्नमागील पाच वर्षांत टँकरद्वारे पाणीपुरवठा झालेल्या गावांचा जलयुक्त शिवार तीनमध्ये प्राधान्य मिळणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपुण्यात राहुल गांधीच्या “छात्रों की गुंज” कार्यक्रमासाठी अटी घालून परवानगीव्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खूनकोरेगाव भीमा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मार्ग मोकळापुण्यात आध्यात्मिक गुरहणे तरूणीचे अर्धनग्न फोटो मागून घेतलेसुकन्या समृद्धी योजनेत मुलींच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचे आवाहनपिंपरी चिंचवड परिसरातील भूसंपादनाची प्रलंबित कामे ३१ ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करावेतवयस्कर  शेतकऱ्यांसाठी आधार प्रमाणीकरणाची विशेष सुविधासहकारनगरात स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; ५ महिलांची सुटका

पुण्यात पीएमपी वाहक महिलेला शिवीगाळ

कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पीएमपी वाहक महिलेला शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी एका प्रवाशाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला. धीरज रामचंद्र ब्रिजवासी (वय ३२, रा. चंदननगर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पीएमपी वाहक महिलेने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाेलीस शिपायाला शिवीगाळ प्रकरणी गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरेगाव पार्क भागातून पीएमपी बस सोमवारी (२९ सप्टेंबर) सायंकाळी साडेसातच्या सुमारास निघाली होती. त्यावेळी आरोपी ब्रिजवासीने धावत्या बसमध्ये प्रवेश केला. पीएमपी वाहक महिलेने त्याला ‘धावत्या बसमध्ये प्रवेश करणे चुकीचे आहे. जीवावर बेतू शकते’, असे सांगितले. ब्रिजवासीने वाहक महिलेशी प्रवाशांसमोर बसमध्ये वाद घालण्यास सुरुवात केली. वाहक महिलेला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. त्यानंतर पीएमपी बस चालकाने बस कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात नेली. ब्रिजवासीविरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याला नोटीस बजाविली आहे. पोलीस उपनिरीक्षक माळी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×