शिवाजीनगरमधील घटना
marathinews24.com
पुणे – पीएमपीएल बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन महिलांचे दागिने चोरणारी टोळी सक्रिय झाली असल्याचे वारंवार घडणार्या चोरीच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्रवाशी महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, कामानिमित्त घराबाहेर पडताना प्रवास करावा की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर गावी जाणार्या नागरिकांची स्वागरेट, शिवाजीनगर एसटी स्थानकासह रेल्वे स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. नेमकी संधी साधून गर्दीचा फायदा घेत चोरट्यांकडून महिलांचे दागिने चोरून नेले जात आहेत.
पुणे : तरुणाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक – सविस्तर बातम
शहरातील मध्यवर्ती शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील पीएमपीएल बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना ४ मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी मावळातील बेंबळओहळमध्ये राहणार्या ४८ वर्षीय महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सीसीटीव्हीच्या माध्यमातून चोरट्यांचा माग काढला जात आहे. दरम्यान, मागील काही दिवसांत बसस्थानकात गर्दीचा फायदा घेउन लुटमारीच्या घटनांमुळे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला मूळची मावळ तालुक्यातील बेंबळओहळ गावची रहिवाशी आहे. ४ एप्रिलला कामानिमित्त महिला शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळील पीएमपीएल बसस्थानकात थांबली होती. इच्छितस्थळी जाण्यासाठी बस आल्यामुळे महिला बसमध्ये प्रवेश करीत होती. त्यावेळी बसमध्ये गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख १० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. काही वेळानंतर महिलेला दागिन्याची चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी जवळच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेउन तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय पांढरे तपास करीत आहेत.