महिलेकडील पर्स लंपास, रविवार पेठेतील घटना

महिलेकडील पर्स लंपास, रविवार पेठेतील घटना

 फरासखाना पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महिलेकडील पर्स लंपास, रविवार पेठेतील घटना – खरेदीसाठी आलेल्या एका महिलेकडील पर्स चोरून नेल्याची घटना रविवार पेठेतील कापडगंज परिसरात घडली. पर्समध्ये दहा हजारांची रोकड, सोन्याचे कडे, मोबाइल संच असा ६० हजारांचा ऐवज होता. याबाबत एका महिलेने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरवड्यात कोयते उगारून टोळक्याची दहशत – आठ जणांविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपळे गुरव परिसरातील रहिवासी आहेत. त्या राखी पौर्णिमेनिमित खरेदीसाठी शुक्रवारी (८) रविवार पेठेतील कापडगंज परिसरात खरेदीसाटी आल्या हाेत्या कापडगंज परिसरातील राखी विक्रेत्यांच्या दुकानात गर्दी होती. तेथील राखी विक्री करणाऱ्या स्टाॅलजवळ महिलेने पिशवीत ठेवलेली छोटी पर्स चोरट्यांनी गर्दीत लांबविली. पर्समध्ये सोन्याचे कडे, रोकड, मोबाइल असा मुद्देमाल होता. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने शुक्रवार पेठ पोलीस चौकीत धाव घेऊन तक्रार दिली. पोलीस कर्मचाीर निढाळकर तपास करत आहेत.

सणासुदीच्या काळात रविवार पेठेतील कापडगंज आणि बोहरी आळी परिसरात पुणे शहर, उपनगर, तसेच जिल्ह्यातून नागरिक सहकुटुंब सजावट साहित्य खरेदीसाठी येतात. रविवार पेठेतील कापडगंज भागात गजबजलेला आहे. महिनाभरापूर्वी चोरट्यांनी तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेकडील पर्स लांबविली होती

पीएमपी प्रवासी महिलेकडील दागिने चोरी

पीएमपी बस प्रवास ज्येष्ठ महिलेकडील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लांबिवल्याची घटना घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने शिवाजीनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला शिवााजीनगर भागात राहायला आहेत. महापालिका भवन परिसरातील पीएमपी बसस्थानकात त्या बसमध्ये प्रवेश करत होत्या. चोरट्यांनी गर्दीत महिलेच्या गळ्यातील एक लाख रुपयांचे मंगळसूत्र लांबविले. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करत आहेत.

बेकायदा सावकारी करणाऱ्या महिलेविरुद्ध गुन्हा – खंडणीपोटी सव्वा कोटी रुपयांची मागणी

पुणे – कल्याणीनगर भागात बेकायदा सावकारी करणाऱ्या एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महिलेने तक्रारदाराके एक काटी २५ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी ज्युली विनय चाल्स (रा. कल्याणी नगर, पुणे) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्राारदार तरुणाने आरोपी महिलेकडून व्याजाने पैसे घेतले होते. परतफेड करुन तक्रारदाराने आरोपी महिलेला एक कोटी १३ लाख रुपये दिले. त्यनंतर आरोपीने आणखी सव्वाकोटी रुपयांची खंडणी मागितली. महिलेने तक्रारदार आणि त्यांच्या वडिलांकडून घेतलेल्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर कर्जाची रक्कम ही कंत्राट व्यवसायातील गुंतवणूक असल्याचे लिहून घेतले.. तिने बनावट कागदपत्रे तयार केली. कागदपत्रे व्याजाच्या वसूलीसाठी असल्याचे भासवले.

बनावट कागदपत्रांचा वापर तक्रारदार तरुण, तसेच त्याच्या कुटुंबाविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी करण्यात आला. आरोपी महिलेने साथीदारांशी संगनमत करून तक्रारदार आणि त्यांच्य कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली .आरोपी महिलेने बनावट कागदपत्रांचा वापर करुन तक्रारदाराकडे खंडणीची मागणी केली. तिच्या त्रासामुळे घाबरलेल्या तरुणाने येरवडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×