पोलिसांनी क्रेन चालक याच्याविरोधात केला गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – क्रेनच्या पुढील बाजूला असलेल्या टपावरून खाली पडल्याने एका हेल्परचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) संध्याकाळी पावणे पाचच्या सुमारास चांदणी चौकाच्या पुढे मुंबई-बंगळुरू महामार्गावर घडली. राजकिशोर बाबूलाल यादव (२४) असे मयत तरुणाचे नाव आहे. राजकिशोर याचा भाऊ बैजनात यादव (२८, रा. आंबेगाव, मुळ रा. उत्तरप्रदेश) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी क्रेन चालक रघुनाथ शंभु पंडित (३५, रा. वडगाव बुद्रुक, मुळ रा. बिहार) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
हत्यार हवेत फिरवत धमकी देणारा गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रघुनाथ हा १७ टनी क्रेन घेऊन मुंबई-बंगळुरू महामार्गावरून जात असताना राजकिशोर क्रेनच्या पुढील बाजूला असलेल्या टपावर बसला होता. अचानक तो क्रेनवरून खाली पडला. त्यात क्रेनचे मागचे चाक त्याच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला लगेचच ससून रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे करत आहेत.



















