दुर्घटनेस जबाबदार प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – वेल्डींगचे काम करताना कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना गंज पेठेत घडली. सुरक्षेविषयक काळजी न घेता दुर्घटनेस जबाबदार असल्याप्रकरणी खडक पोलिसांनी घर मालकासह ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला.
पुणे : पोलिसांचा खबरी असल्याचा केला आरोप – सविस्तर बातमी
रोहित बाळू पवार (वय २८, रा. घोरपडी पेठ) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. पवार यांची पत्नी चैत्राली पवार (वय २२) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार,रोहिदास वसंत अडागळे (रा. गंजपेठ), कैलास जालिंदर सकट (रा. लोहियानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित गंज पेठेतील फकीर गल्लीत दुमजली घरात २६ ऑगस्ट २०२३ रोजी वेल्डींगचे काम करत होते. त्यावेळी पहिल्या मजल्यावरुन त्यांचा मृत्यू झाला होता. कामाच्या ठिकाणी पुरेशी सुरक्षाविषयक साधने न उपलब्द करुन दिल्याने दुर्घटना घडल्याचे रोहित यांची पत्नी चैत्राली यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले होते. चैत्राली यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलीस निरीक्षक अनिता तोंडे तपास करत आहेत.