लोहगावमधील दादाची वस्तीजवळ घडला अपघात
marathinews24.com
पुणे – भरधाव मोटार चालकाने दिलेल्या धडकेत गंभीररित्या जखमी झालेल्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला ओह. हा अपघात २७ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास लोहगाव परिसरात घडला होता. याप्रकरणी मुलाच्या वडिलांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, दोघांना अटक – सविस्तर बातमी
आयुष चंद्रकांत पुजारे (वय २१ रा. समर्थनगर, साठेवस्ती, लोहगाव ) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार चंद्रकांत पुजारे यांचा मुलगा आयुष हा २७ ऑक्टोबरला रात्री साडेअकराच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात होता. त्यावेळी दादाची वस्ती परिसरात भरधाव अज्ञात वाहन चालकाने आयुषच्या दुचाकीला धडक दिली.
त्यामुळे खाली पडून आयुष गंभीररित्या जखमी झाला होता. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अशोक शिरसाठ तपास करीत आहेत.



















