जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार, दोघांना अटक

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

टिंबर मार्केटमधील घटना

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून टोळक्याने तरूणावर कोयत्याने वार करून गंभीररित्या जखमी केल्याची घटना १ नोव्हेंबरला रात्री बाराच्या सुमारास टिंबर मार्वेâटमधील भगवती सॉ मिलसमोर घडली आहे. याप्रकरणी दोघा हल्लेखोरांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या पसार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.

पुण्यात भरधाव मोटार मेट्रोच्या खांबाला धडकली, ३ तरुण ठार – सविस्तर बातमी

करण उर्फ ठोंब्या भानुदास आगलावे (वय २२ रा. लोहियानगर) आणि आदर्श उर्फ आदर्‍या भारत हणुवते (वय २० रा. लोहियानगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जखमी झालेल्या तरूणाच्या २५ वर्षीय मित्राने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण आणि त्याचा मित्र लोहियानगरमध्ये राहायला असून, १ नोव्हेंबरला रात्री बाराच्या सुमारास टिंबरमार्वेâटमध्ये रिक्षात बसले होते. त्यावेळी तिथे आलेल्या टोळक्याने जुन्या वादातून रिक्षातील तरूणावर कोयत्याने वार गंभीररित्या जखमी केले. तसेच तक्रारदाराला मारहाण करीत त्यांना धमकावले. परिसरात दहशत निर्माण करीत दादागिरी केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करीत आहेत.

वाहतूक अमलदाराला मारहाण, तरूणाला अटक

पुणे – वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहन दामटणार्‍या तरूणाला पोलिसांनी थांबण्यास इशारा करूनही त्याने वाहन पळविले. त्यानंतर अमलदाराने त्याचा पाठलाग करून अडविले असता, संबंधिताने वाहतूक कर्मचार्‍याला मारहाण केली. ही घटना ३१ ऑक्टोबरला संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हडपसरजवळील १५ नंबर चौकात घडली आहे.

रमाकांत दत्तात्रय शिंदे (वय ४८ रा. पिसोळी ) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. त्यासोबत एक साथीदार असल्याचेही स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार महादेव धामनगावकर यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अमलदार धामणगावकर हे हडपसर वाहतूक विभागात कार्यरत आहेत. ३१ ऑक्टोबरला ते संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मांजरी बुद्रूक परिसरातील १५ नंबर चौकात वाहतूक नियमन करीत होते. त्यावेळी वाहन चालक रमाकांत शिंदे याने नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे धामणगावकर यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्यानंतरही त्याने वाहन जोरात दामटले. त्यामुळे वाहतूक अमलदाराने काही अंतरावर पाठलाग करीत चालकाला ताब्यात घेतले. त्यावेळी त्याने अमलदाराला थेट मारहाण केली. शिवागाळ करीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×