Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

तरूणाचे अपहरण करीत बेदम मारहाण, पिस्तूलानेही धमकावले

भांडणात मध्यस्थी अंगलट, तरूणावर वार

टोळक्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी केला गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – मोटारीतून तरूणाचे अपहरण करीत त्याला बेदम मारहाण करणार्‍या टोळक्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. टोळक्याने संबंधित तरूणाच्या डोक्याला दोन पिस्तूल लावून धमकावल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. ही घटना ८ नोव्हेंबरला रात्री पावणेअकराच्या सुमारास आंबेगाव बुद्रूकमध्ये घडली आहे. श्वेतांग निकाळजे, रोमिया कांबळे, ओम गायकवाड, स्वप्नील कांबळे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवा मुत्याळ (वय ३१ रा. आंबेगाव बुद्रूक) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार शिवा आणि आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ८ नोव्हेंबरला आरोपींनी शिवाला विरंगुळा रेसीडन्सीपासून गाडीत बसवून अपहरण केले. तु लय मोठा झालाय, एकटाच कंत्राट घ्यायला लागला आहेस, टॉवर कंपनीचे पैसे दे असे म्हणत टोळक्याने शिवाला मारहाण केली. त्याच्या गळ्याला कोयता लावून धमकावले. त्यानंतर भोर रस्त्यावर नेउन त्याला गाडीतून खाली उतरवले. आरोपींनी त्यांच्याकडील दोन पिस्तूल शिवाच्या डोक्याला लावून धमकाविण्यात आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×