Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

तरूणाला शेअर मार्केटचे आमिष पडले २६ लाखांना

सायबर चोरांकडून तिघांना २४ लाखांचा ऑनलाईन गंडा

सायबर चोरट्यांचा घातला गंडा

marathinews24.com

पुणे – बुल मार्केट इंटरनॅशनल शेअर ट्रेडींग कंपनीचा एजंट असल्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २५ लाख ८९ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ ते २८ एप्रिल २०२५ कालावधीत बाणेरमध्ये घडली आहे. याप्रकरणी प्रसाद गणबोटे (वय ४० रा. बाणेर) यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्वतः च्या गाडीवर घडवून आणला गोळीबार – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार प्रसाद गणबोटे बाणेरमध्ये राहायला असून, १ एप्रिल २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. बुल मार्केट इंटरनॅशनल शेअर ट्रेडींग कंपनीचा एजंट असल्याची बतावणी केली. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष त्याने प्रसादला दाखविले. त्यानुसार प्रसादने गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. अवघ्या एक महिन्यांत त्यांनी सायबर चोरट्यांनी सांगितलेल्या विविध बँक खात्यात तब्बल २५ लाख ८९ हजार रूपये वर्ग केले. मात्र, त्यांना परतावा न मिळाल्यामुळे प्रसादने संबंधिताला विचारणा केली.

त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क तोडून फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करीत आहेत.

ऑनलाईन शेअर मार्केटचा हव्यास नकोच

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूकीच्या नावाखाली सायबर चोरट्यांकडून नागरिकांना जाळ्यात अडकविले जात आहे. सुरूवातीला काही रकमेचा परतावा देउन विश्वास संपादित केला जातो. त्यानंतर मात्र, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून घेतल्यानंतर संपर्क बंद करीत फसवणूक केली जात आहे.

मागील काही महिन्यांत शहरातील विविध भागातील नागरिकांना सायबर चोरट्यांनी अशाच पद्धतीने लाखो रूपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे नागरिकांनो ऑनलाईनरित्या आलेली लिंक, फोन, मेसेजला उत्तर देउ नका. जादा परतावा मिळण्याच्या हव्यासापोटी कोणावरही विश्वास ठेउ नका. गुंतवणूक करू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×