बस प्रवासात तरुणाचा ८० हजारांचा मोबाइल चोरीला

पुण्यात पीएमपीएल प्रवासी महिलेचे ७ लाखांचे दागिने लंपास

डेक्कन जिमखाना परिसरात घटना

marathinews24.com

पुणे – पीएमपीएल बस प्रवासात गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रवासी तरुणाकडील ८० हजार रुपयांचा मोबाइल लांबविल्याची घटना डेक्कन जिमखाना परिसरात घडली. याबाबत तरुणाने डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमसंबंधातील वादातूनच झाला खून; ५ जण अटकेत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण वाकड भागात राहायला आहे. गेल्या महिन्यात तो कामानिमित्त डेक्कन जिमखाना भागात आला होता. कर्वे रस्त्यावरील शेलारमामा चौकातील पीएमपी थांब्यावर तो थांबला होता. बसमध्ये प्रवेश करत असताना चोरट्यांनी तरुणाच्या खिशातील ८० हजार रुपयांचा मोबाइल संच लांबविला. मोबाइल चोरीला गेल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार पारगे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×