प्रेमसंबंधातील वादातूनच झाला खून; ५ जण अटकेत

खून करण्यासाठी कोयते बाळगले, चौघे अल्पवयीन ताब्यात

चंदननगरमधील तरुणाच्या खुनाची उकल

marathinews24.com

पुणे – प्रेमसंबंधातील वादातून तरुणाचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी ५ आरोपींना चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. ऑक्सिजन पार्क येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या खूनप्रकरणी अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले.

पर्वती भागात घरफोडी करणारा चोरटा अटकेत – सविस्तर बातमी

लखन बाळू सकट (वय १८, रा. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रथमेश शंकर दारकू (वय २०), यश रवींद्र गायकवाड (वय १९), जानकीराम परशुराम वाघमारे (वय १८), महादेव पांडुरंग गंगासागरे (वय १९), बालाजी आनंद पेदापुरे (१९, सर्व रा. बोराटे वस्ती, चंदननगर) यांना अटक केली. केशव बबन वाघमारे (वय ३२, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीशी असलेल्या प्रेमसंबंधातून लखन सकट आणि आरोपी यश गायकवाड यांच्यात वाद झाला होता. शनिवारी (६ नोव्हेंबर) सायंकाळी सातच्या सुमारास आरोपी यशने लखनला चंदननगरमधील राजमाता जिजाऊ ऑक्सिजन पार्क परिसरात बोलावून घेतले. लखन मित्रासाेबत तेथे आला असता, तेव्हा यशने त्याच्याकडे विचारणा केली. ‘मुलीशी तुझा संबंध काय आहे. तू काम मध्ये पडतो’, अशी विचारणा केली. त्यानंतर यश आणि लखन यांच्यात पुन्हा वाद झाला. त्यानंतर यश आणि त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांनी लखनला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

लखनवर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या लखनला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या पाच आरोपींसह अल्पवयीनाला रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आले. खून प्रकरणात पसार झालेल्या दोन ते तीन जणांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक ढाकणे यांनी दिली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×