Breking News
Pune Bal Kumar Marathi Sahitya Sammelan 2026 : पुण्यात २७ व २८ नोव्हेंबरला बालकुमार साहित्य संमेलनSupriya Sule Pune Crime Statement : पुण्याची ओळख गुन्हेगारी, दहशतीचे शहर- खासदार सुप्रिया सुळेConstitution Day 2026 Pune : संविधान दिनानिमित्त गुरुवारी राजगड, शिवनेरी आणि लोहगडावर स्वच्छता व संवर्धन अभियानHoney Village Scheme Pune : पुणे जिल्ह्यात कोंढवळ व कुसूर ही दोन गावे होणार ‘मधाचे गावं’Pune Shivajinagar Court Attack : पुण्यात न्यायालयाबाहेरच आरोपीवर कोयत्याने वार करुन हात तोडलेRobotics championship 2026 : पुणे जिल्हा परिषद शाळांतील २५० विद्यार्थ्यांची रोबोटिक्स राष्ट्रीय स्पर्धेत चमकShivajinagar Court Attack Pune : शिवाजीनगर न्यायालय आवारात तरुणावर खूनी हल्लाAI Trading Fraud in Pune : एआय ट्रेडिंगच्या नावाखाली गुंतवणूकदारांची दीड कोटींची फसवणूकPune Crime News : पैसे परत मागितल्याने तरुणावर कोयत्याने वारPune Bank Loan Fraud : जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा

लग्न जमवण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल अंगलट

लग्न जमवण्यासाठी तरुणाची अनोखी शक्कल अंगलट

पोलीस भरती झाल्याचे सांगून सोसायटीत पेढे वाटले; बतावणी करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – पोलीस भरती झाल्याचे सांगून एका तरुणाने सोसायटीत पेढे वाटले, तसेच अभिनंदन करणारा फलक चौकात लावला. नऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी तरुणाचे अभिनंदन करण्यासाठी गेले. तेव्हा तरुणाने समाजात प्रभाव पाडण्यासाठी पोलीस भरती झाल्याचा फलक लावून सोसायटीत पेढे वाटल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ऋषीकेश राजू जाधव (वय २६, रा. तिडके डेअरीजवळ, नऱ्हे) असे गु्नहा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पुण्यात दंडात्मक कारवाईऐवजी पैसे उकळले; दोन वाहतूक पोलीस निलंबित – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झालेला तरुणाचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला पोलीस दलात भरती व्हायचे होते. मात्र, उंची कमी असल्याने त्याचे पोलीस भरतीचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी त्याला व्यवसायावर लक्ष केंद्रीत करुन लग्नाचा विचार कर, असे सांगितले. त्यानंतर पोलीस भरतीचे स्वप्न बाळगणाऱ्या तरुणाने काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांना पोलीस दलात भरती झाल्याचे सांगितले. भरती प्रक्रियेत निवड झाल्याचे सांगून त्याने सोसायटीत फलक लावले, तसेच दोन दिवसांपूर्वी चौकात स्वत:चे अभिनंदन करणारा फलकही लावला.फलकावर तरुणाचे छायाचित्र, पोलीस दलाचे बोधचिन्ह होते. तरुणाने समाजमाध्यमात पोलीस गणवेशातील छायाचित्र ठेवले. त्यानंतर नऱ्हे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी त्याचे अभिनंदन करण्यासाठी गेले. चौकशीत तरुणाची पोलीस दलात निवड झाली नसल्याचे उघड झाले.

शासकीय सेवेत त्याची निवड झाली नव्हती, तसेच त्याने पोलीसांचा गणवेश परिधान करुन छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित केल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलीस फौजदार शिंदे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×