प्रेम संबंधावरून तरुणीला त्रास; विरोध करणाऱ्या मामाचा खून

नांदेडसिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – प्रेम संबंधावरून तरुणीला त्रास देणाऱ्या तरुणाला मामा समजावून सांगण्यास गेल्यानंतर त्यांच्यात झालेल्या वादातून दोघांनी त्या मामाचा जबर मारहाणकरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली. डीएसके धायरी परिसरात ही घटना रात्री घडली. दरम्यान, खून करणारे आरोपी पसार झाले असून, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे.

‘डिजिटल अरेस्टच्या बतावणीने जेष्ठाची १० कोटी ७४ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी

विशाल प्रशांत हबीब (वय २८, रा. बारंगणीमळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विशाल यांच्या भावाने ततक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, विशाल यांच्या नात्यातील मुलीसोबत एका आरोपीची ओळख होती. तो तिला बोलत होता. तिला त्रास देत होता. हा प्रकार विशाल यांना समजला. तेव्हा त्यांनी यातील आरोपीला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, याचा राग आरोपींच्या मनात होता. घटनेच्या दिवशी देखील विशाल हा आरोपीला समजावून सांगत असताना त्यांच्यात वादविवाद झाले. तेव्हा आरोपींनी विशाल यांना बेदम मारहाण केली. तोडांवर, कपाळावर तसेच इतरत्र गंभीर मारहाणकरून त्याचा खून केला. खूनानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच नांदेडसिटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. पोलिसांकडून पसार झालेल्या आरोपींचा शोध घेतला जात आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×