कोंढव्यात जुन्या वादातून तरूणावर कोयत्याने वार

कोंढव्यातील एनआयबीएम संस्थेत चोरी

आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – जुन्या वादातून एकाने तरूणावर कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न केला आहे. ही घटना २४ एप्रिलला संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोंढव्यातील मोमाजी सुपर मार्वेâट दुकानासमोर घडली आहे. याप्रकरणी तरूणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार एका आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव शेरी, उरळी देवाची परिसरात घरफोडी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कोंढवा खुर्द परिसरात राहायला असून, २४ एप्रिलला तो मोमाजी सुपर मार्वेâटसमोर मित्रासोबत बोलत थांबला होता. त्यावेळी आरोपीने जुन्या वादाच्या रागातून त्याला गाठले. त्यानंतर त्याच्यावर कोयत्याने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. आरोपीने केलेल्या हल्ल्यात तरूण गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पंकज खोपडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×