Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

महाविद्यालयातील भांडणातून तरुणाला मारहाण

वैमनस्यातून तरुणाला बॅटने मारहाण

टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – महाविद्यालयात झालेल्या भांडणातून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली भागात घडली. या प्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संघर्ष सुनील सातव (वय २३, रा. बायफ रस्ता, वाघोली, नगर रस्ता) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाणेर भागात पादचारी महिलेेशी अश्लील कृत्य – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संघर्ष याचा महाविद्यालायात आरोपींशी वाद झाला होता. महाविद्यालयातील वाद मिटला होता. गुरुवारी (२९ जानेवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास संघर्ष, त्याचे दोन मित्र वाघोलीतील ‘गेमझोन’ येथे पूल खेळण्यासाठी गेले होते. त्या वेळी आरोपी तेथे आले. संघर्ष आणि त्याचा मित्र प्रेमपुरी याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पूलसाठी वापरल्या जाणाऱ्या काठीने दोघांना बेदम मारहाण केली. पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×