पानशेत धरणात बुडून तरुणाचा मृत्यू

वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

marathinews24.com

पुणे – पानशेत धरणात पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. सद्दाम चांँद व्हसुरे (वय ३० ,रा. घुले काॅलनी, नांदेड सिटीजवळ, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वेल्हे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

पुढे साहेब आहेत गळ्यातील सोनं काढून ठेवा म्हणत जेष्ठ महिलेची फसवणूक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सद्दाम व्हसुरे, त्याचे मित्र रायगड तालुक्यात माणगाव येथे गेले होते. तेथून ते मोटारीतून परतत होते. पानशेत धरण परिसरात सद्दाम, त्याचे मित्र प्रकाश माळी, अनिल ओव्हाळ, राहुल गायकवाडे हे गुरुवारी दुपारी पानशेत धरण परिसरात आले. धरणाच्या काठावर बसून त्यांनी भेळ खाल्ली. सद्दाम धरणात पाेहोण्यासाठी उतरला. पोहताना तो बुडाला. सद्दामला मित्रांनी पाण्यातून बाहेर काढले. बेशुद्धावस्थेतील सद्दामाला मित्रांनी वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. बेशुद्धावस्थेतील सद्दामचा उपचारांपूर्वीच मृत्यू झाल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक किशोर शेवते, हवालदार मोघे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार मोघे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×