Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – टेम्पोच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील केसनंद फाटा परिसरात घडली. अरफात इसतियाक अन्सारी (वय २०, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली, अहिल्यानगर रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याबाबत अरफात याचे मामा आसीफ नासीर अन्सारी (वय ४२, रा. संत तुकारामनगर, केसनंद फाटा, वाघोली, अहिल्यानगर रस्ता) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आंबेगाव बुद्रुक परिसरात फ्लॅटचे कुलूप तोडून ८ लाखांचा ऐवज चोरी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अरफात अन्सारी रविवारी (१६ ऑगस्ट) सकाळी सव्वापाचच्या सुमारास वाघोलीतील केसनंद फाटा चौकातून निघाला होता. त्यावेळी भरधाव टेम्पोने अरफात याला धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता टेम्पो चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या अरफात याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पसार झालेल्या टेम्पो चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक वैजीनाथ केदार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×