डेक्कन जिमखानामधील घटना
marathinews24.com
पुणे – भागातील भुयारी मार्गाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना डेक्कन जिमखाना घडली. कठड्यावर आदळल्यानंतर दुचाकीस्वार तरुण थेट भुयारी मार्गात कोसळला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.धवल नारखेडे (वय २२, रा. द्वारिकानगर, सिडको, छत्रपती संभाजीनगर) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई गणेश डोईफोडे यांनी डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
देशी-विदेशी दारु विक्रीचा पर्दापाश, माय-लेकाला अटक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार धवल हा सोमवारी (७ जुलै) सकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव वेगात डेक्कन जिमखाना भागातून निघाला होता. गरवारे भुयारी मार्गावरील छोट्या पुलाच्या कठड्यावर भरधाव दुचाकी आदळली. त्यानंतर त्याचे नियंत्रण सुटले आणि तो दुचाकीसह भुयारी मार्गात कोसळला. अपघातात धवलच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कुलकर्णी, हवालदार साडेकर यांनी घटनास्थळी भेट दिली.
धवलची बहीण पिंपरीत राहायला आहे. तो पुण्यात नोकरीच्या शोधात आला होता. सध्या तो पिंपरीत राहत होता. त्याला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाली होती. याबाबतची माहिती त्याने वडिलांना दिली होती. कामाला जात असताना ही दुर्घटना घडली. गंभीर जखमी झालेल्या धवल याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हवलदार बोराटे तपास करत आहेत.
डीएसके’ प्रकरणातील गुंतवणूकादारांना आवाहन
बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या कंपनीत गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक झालेल्या गुंतवणुकादारांना शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार गुंतवणुकदारांची यादीही तयार केली होती. यादीतील दुरुस्तीच्या अनुषंगाने १५ जुलैनंत उपस्थित रहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आले आहे.
डीएसके प्रकरणातील गुंतवणुदारांनी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात १० ते १२ जुलै, १४ ते १५ जुलै, १६ ते १८ जुलै दरम्यान उपस्थित राहण्याबाबत आवाहन करण्यात आले होते. त्याअनुषंगाने पोलिसांनी यादी तयार केली होती . तांत्रिक कारणामुळे हे काम शक्य ठरवून दिलेल्या दिवशी शक्य होत नसल्याने गुंतवणुकदारांनी १५ जुलैनंतर उपस्थित रहावे, असे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांनी केले आहे. १५ जुलैनंतर गुंतवणुकदारांनी टेलीग्राम मोबाइल ॲप (EOW PUNE DSK FD DATA, @mydskfdbot,) जिल्हाधिकारी कार्यालय संकेतस्थळ (pune.gov.in,), पोलीस आयुक्त संकेतस्थळ ( punepolicegov.in) येथे सुधारित यादी पहावी. त्यानंतर ठरवून दिलेल्या दिनांकानुसार शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.