Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

किरकोळ वादातून टोळक्याने केलेल्या मारहाणीत तरुण ठार

किरकोळ वादातून रखवालदारावर चाकूने वार

रूग्णालयात न नेता, रिक्षातून सोडले सोसायटीच्‍या गेटजवळ

marathinews24.com

पुणे – किरकाेळ वादातून झालेल्या मारामारीत गंभीर जखमी झालेल्या तरुणाला रूग्णालयात न घराजवळ सोडून दिले. काही वेळानंतर रूग्णालयात दाखल केल्‍यानंतर त्याचा मृत्यू झाल्याची घटना भारती विद्यापीठ भागात घडली. तरुणाच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी (सदोष मनुष्यवधप्रकरणी) पोलिसांनी एकाला अटक केली. सौरभ संजय शिखरे (वय २८, रा. लुमिनार हाईट्स, लिपाणे वस्ती, आंबेगाव, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी तेजस विकास सणस (वय १९, रा. आंबेगाव, कात्रज) याला अटक केली. सणस याच्याबरोबर असलेल्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; टोळक्याविरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या महिन्यात २५ डिसेंबरला भारती विद्यापीठ परिसरात असलेल्‍या अंडा बुर्जीच्‍या गाडीवर सौरभ शिखरे हा अंडा बुर्जी खाण्यासाठी गेला होता. तेथे आरोपी तेजस सणस आणि सौरभ शिखरे यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. वादातून आणि त्याच्याबरोबर असलेल्या तीन साथीदारांनी शिखरे याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाणीत सौरभ रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तर यावेळी सौरभचा मित्र बालाजी कर्डीले यालाही आरोपींनी हाताने मारहाण केली. यावेळी बालाजी घाबरून तेथून निघून गेला. बेशुध्द अवस्‍थेत त्यांनी सौरभला दवाखाण्यात न नेता रिक्षाने त्‍याच्‍या राहत्‍या घराच्‍या गेटजवळ आणून सोडले. यावेळी खासगी रूग्णालयात उपचार घेत असताना उपचारा दरम्‍यान २८ जानेवारीला मृत्‍यू झाला. वैद्यकीय तज्ज्ञांचा अभिप्राय, शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपी सणस याला अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

शवविच्‍छेदनासाठी सौरभचा मृतदेह ससून रूग्णालयात दाखल केला होता. पोस्‍टमार्टम रिपोर्टमध्ये सौरभच्‍या डोक्‍याच्‍या उजव्या बाजुस अंतर्गत मार लागल्‍याचे स्पष्ठ झाले. यावेळी घटनास्‍थळावरील सीसीटिव्‍ही फुटेची तपासणी केली असता तेजस सणस व त्‍याचे मित्र यांचे धक्‍काबुक्‍कीत सौरभ खाली पडला. याप्रकरणी सदोष मनुष्य वधाचा गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×