Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न; टोळक्याविरुद्ध गुन्हा

पादचारी जेष्ठेचे पावणेदोन लाखांचे गंठण हिसकावले

टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना कात्रजमधील संतोषनगर परिसरात घडली. याप्रकरणी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. अजमल अब्दुल नदाफ (वय २०, रा. आशियाना बिल्डींग, अंजनीनगर, कात्रज ) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी आर्यन काळे, यश बोरकर, शुभम पोगुल यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अब्दुल रहीम नदाफ (वय ४५) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

महाविद्यालयातील भांडणातून तरुणाला मारहाण – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजमल नदाफ याची आरोपींशी भांडणे झाली होती. गुरुवारी (२९ जानेवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अजमल हा कात्रजमधील संतोषनगर भागातून निघाला होता. त्या वेळी आरोपींनी अजमला याला अडविले. त्याला शिवीगाळ करुन तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला पोलिसांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×