Breking News
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

दुचाकी घसरल्याने अपघातात तरूण ठार, एकजण जखमी

विश्रांतवाडीजवळ फुलेनगर परिसरात घडला अपघात

marathinews24.com

पुणे – भरधाव वेगातील दुचाकी घसरून झालेल्या अपघातात तरूणाचा मृत्यू झाला आहे. अपघातात एकजण जखमी झाला असून, त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात २० एप्रिलला रात्री अकराच्या सुमारास विश्रांतवाडीजवळ फुलेनगर परिसरात घडला आहे. अजयकुमार डोमन मंडल (वय ३०, रा. येरवडा, मूळ-बिहार) असे ठार झालेल्याचे नाव आहे. सुजीत सहाणी (वय ३०, रा. विश्रांतवाडी ) असे जखमीचे नाव असून, त्याने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस असल्याच्या बतावणीने जेष्ठ महिलेला लुटले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजयकुमार आणि सुजीत हे २० एप्रिलला रात्री अकराच्या सुमारास दुचाकीवरून फुलेनगरातून प्रवास करीत होते. त्यावेळी अजयकुमार हा दुचाकी चालवित असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे दुचाकी घसरून अपघात झाल्याने दोघेही खाली पडले. वाहन चालक अजयकुमार गंभीररित्या जखमी झाला. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शेख तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×