Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

मुंढव्यातील झेड काॅर्नर भागात तरुणाचा खून

धनकवडीतील उड्डाणपुलाजवळ एकाचा खून

१५ दिवसांत मुंढव्यात तीन खून

marathinews24.com

पुणे – शहरातील मुंढवा परिसरात गेल्या पंधरा दिवसांत तीन खून झाले. शनिवारी सकाळी मुंढव्यातील झेड काॅर्नर भागात एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खून झालेल्या तरुणाची ओळख रात्री उशिरापर्यंत पटू शकली नाही. या प्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून साडेचार लाखांची ऑनलाइन फसवणूक – सविस्तर बातमी

मुंढव्यातील झेड काॅर्नर हा गजबजलेला चौक आहे. शनिवारी सकाळी या चौकात जखमी अवस्थेत एक तरुण पडल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहाेचले. जखमी अवस्थेतील तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. घटनास्थळी पोलिसांना मोबाइल संच सापडला असून, तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुंढवा पोलिसांनी दिली.

मुंढवा परिसरात गेल्या आठवड्यात अनैतिक संबंधातून एका ब्युटीपार्लरचालक तरुणीचा गळा दाबून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा छडा गुन्हे शाखेने लावला. या प्रकरणात एकाला अटक करण्यात आली. दारू पिताना झालेल्या वादातून मित्राने लोकेश मानसिंग ठोंबरे (वय ३०) याच्या डोक्यात दगड घालून खून केला होता. या प्रकरणात ठोबरे याच्या अल्पवयीन मित्राला अटक करण्यात आली होती. मुंढवा परिसरात गेल्या पंधरा दिवसात तीन खून झाले आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×