Breking News
पुणे, पिंपरी चिंचवड शहराची वाढती विजेची गरज ध्यान्यात घेऊन बहृत आराखडा तयार करापुणे ग्रोथ हब आराखडा अंतिम करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करा- व्ही. राधामहाराष्ट्र राज्य सहकारी संघाच्या संचालक कार्यालयाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटनपुणे जिल्ह्यात सर्व स्वयं सहाय्यता समूहाची ‘लोकोश ॲप’वर नोंदणी- प्रकल्प संचालक शालिनी कडूबारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवारांच्या खर्चाची दुसरी तपासणी पूर्णएआय सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ; दर्जेदार आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग कटिबद्ध -राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर‘स्वप्नसुंदरी मी भारताची २०२६’ : पुण्यात सौंदर्य स्पर्धेचे आयोजननगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावीविधिमंडळात विद्यार्थ्यांची अभ्यासक भेट; डॉ. नीलम गोऱ्हे यांचा संवाद ठरला आकर्षणरोजगाराच्या नावाखालील फसवणुकीपासून सावध रहा 

तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीला

तुळशीबागेत महिलांकडील दागिने चोरीला

विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – तुळशीबागेत खरेदीसाठी गेलेल्या महिलांकडील ७२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला. तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून ७२ हजार रुपयांचे मंगळसूत्र चोरट्याने लांबविल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

डाॅक्टरांची ‘ऑनलाइन अपाॅईंटमेट’ घेणाऱ्या महिलेची ५ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी 

तक्रारदार महिला तुळशीबागेत शनिवारी (४ एप्रिल) दुपारी चारच्या सुमारास खरेदीसाठी गेली होती. तुळशीबाग गणपती मंदिर परिसरात चोरट्याने पिशवीत ठेवलेले मंगळसूत्र चोरून नेले. रविवारी (५ एप्रिल) दुपारी तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या महिलेच्या पिशवीतून २० हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ५५ वर्षीय महिला वारजे-एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर भागात राहायला आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास त्या तुळशीबागेत खरेदी करत होत्या. त्यावेळी गर्दीत महिलेचे लक्ष नसल्याची संधी साधून चोरट्यांनी पिशवीतून मंगळसूत्र चोरून नेले. पोलीस कर्मचारी गोरे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×