सचोटी इमानदारी हीच व्यवसायाची गुरुकिल्ली असल्याचे सांगत जोपर्यंत स्पर्श आहे तोपर्यंत जीवन आहे असे सांगत स्नेह जिव्हाळा जिवंत राहू द्या आभासी दुनियेतून बाहेर पडून एकमेकांना भेटा चर्चा करा निसर्गावर प्रेम करा अशा अनेक मुद्द्यांना हात घालत. नातेसंबंध, मैत्री व व्यवसाय यांची सांगड कशी घालावी व जीवनाचा आनंद कसा घ्यावा याबाबत लेखक गणेश शिंदे यांनी अनेक उदाहरणाचे दाखले देत रियल इस्टेट च्या सभासदांना संबोधित केले.
असोसिएशन ऑफ रियल इस्टेट एजंट या संस्थेच्या सभासदांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. गेली पंधरा वर्षे सातत्याने असोसिएशनच्या वतीने या मेळाव्याचे आयोजन करण्यात येते.
असोसिएशन च्या उपक्रमाची माहिती देताना अध्यक्ष सचिन शिंगवी म्हणाले की व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रात असोसिएशन अग्रेसर असून गेली तीन वर्ष मुद्रांक शुल्क वाढ न करणे साठी वेळोवेळी मुख्यमंत्री, महसूलमंत्री,नोंदणी निरीक्षक यांच्याशी संपर्क करून परिस्थितीचे गांभीर्य मांडून असंघटित ग्राहकांन साठी लढा उभा केला आहे तसेच भाडेकराराचे पोलीस व्हेरिफिकेशन ऑनलाईन होण्या संदर्भात पुण्याचे पोलिस आयुक्तांशी संवाद साधून जनतेच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे तर प्रमाणित गुंठेवारी घरांच्या पुनर्विक्रीत सर्वसमण्याची होणारी मुस्कटदाबी त्वरित थाबण्या साठी पुणे मनपा आणि महसूल खात्याने इंटिग्रेट करून माहितीचे आदान-प्रदाना चे पाऊल उचलून सर्वसामान्यांना दिलासा मिळेल अशी भूमिका घेत सर्वसान्याचा आवाज सरकार दरबारी पोहोचवला आहे.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी असोसिएशनने “आवाज जनतेचा” ह्या पुरस्काराने पत्रकार दिगंबर दराडे आणि संजय कडू यांना सन्मानित करण्यात आले. तसेच समाजसेवेच्या उल्लेखनीय कार्याबद्दल असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर (ASP) संस्थेचे सचिव मंगेश पाटील यांना पुरस्कृत करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष सचिन शिंगवी , उपाध्यक्ष रवींद्र चौकसे, खजिनदार उमाशंकर यादव, सचिव राजेंद्र दोशी, अनिल पाटील ,गणेश शेलार, कैलास फोफालिया, गणेश घुमे, सचिन कात्रे, एस के शिंगवी, प्रशांत गांधी, शांतीलाल बोरा यांनी केले तर सूत्रसंचालन रवींद्र चौकसे यांनी केले