हातातील शस्त्रास्त्रे फिरवून नागरिकांमध्ये केली दहशत
marathinews24.com
पुणे – दारु पिताना झालेल्या वादातून तरूणावर धारदार शस्त्राने वार करून खूनाचा प्रयत्न केला. त्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांना शस्त्राचा धाक दाखवत धमकावल्याची घटना ७ मे रोजी आंबेगावातील आमराईत घडली. हल्ल्यात अलोक कोंढरे असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. गणेश कदम, अनिकेत सांडे, ऋषी सावंत आणि पुनित वाघामरे (सर्व रा. भारती विद्यापीठ) यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा आणि दहशत माजविण्याचा गुन्हा दाखल केला आहे. ओमकार वडमारे ( धायरी) याने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
दुचाकी चोरणारा अल्पवयीन ताब्यात, ५ गुन्हे उघडकीस – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी ओमकार हा डिलेव्हरी बॉय असून, बुधवारी दुपारी मित्र अलोक कोंढरे, किरण घोडके, सोमनाथ जगदाळे व इतर काही मित्रांसोबत दारु पिण्यास बसला होता. त्यावेळी आरोपी त्यांच्याजवळ येऊन दारु पित बसले. यावेळी अलोक कोंढरे आणि आरोपी गणेश कदम यांच्यात शाब्दिक वादावादी झाली. यानंतर गणेश कदम तेथून निघुन गेल्यानंतर थोड्या वेळानंतर तो साथीदारांसह माघारी आला. त्याने अलोक कदमचा पाठलाग करुन आंबेगाव घबाडी येथील उत्कर्ष शाळेजवळ त्याला गाठले. आरोपी गणेशने कोयत्याने तर ऋषीकेशने तलवारीने अलोकवर वार केले. त्यानंतर जाताना नागरिकांना शस्त्रे दाखवत दमदाटी केली. आरोपींनी एका मोटारीची तोडफोड केली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक मिथुन परदेशी करत आहेत.