Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

दिवंगत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता

गटांतटातील पुढाऱ्याकडून लक्ष वेधायला सुरूवात

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यातील मस्साजोग गावची ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठीची पोटनिवडणूक जाहिर झाल्याने गावच्या गटातटातील पुढारी आपले पोस्टर बनवून गावातील नागरिकांचे लक्ष वेधायला सुरूवात झाल्याने चर्चेला उधाण आले आहे. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांची पत्नी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे बोलले जात असल्याने हि निवडणूक बिनविरोध होणार का? आणि राहिलेल्या दीड वर्षांच्या कार्य काळासाठी कोणाला निवडणून देणार हेही पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे .

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा राज्यभर यशस्वीपणे संपन्न –  सविस्तर बातमी 

हत्येचा बळी ठरलेल्या सरपंचांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितले की, गावकऱ्यांच्या आग्रहास्तव, हत्या झालेल्या सरपंचांच्या पत्नी अश्विनी या निवडणूक लढवण्यास तयार झाल्या आहेत. तसेच, हत्या झालेल्या सरपंचांना श्रद्धांजली म्हणून, त्यांच्या वारसदाराची निवड बिनविरोध होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील ४७१ गावांमध्ये होणाऱ्या पोटनिवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. डिसेंबर २०२४ मध्ये तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती ,या घटनेच्या पार्श्वभूमीवर मस्साजोग येथील निवडणूक पार पडणार आहे. दरम्यान, धनंजय म्हणाले, “हत्या झालेल्या सरपंचांच्या पत्नी अश्विनी यांनी यापूर्वी सरपंच, उपसरपंच आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सदस्य म्हणून काम पाहिले आहे. माझ्या भावाच्या मृत्यूनंतर, लोक त्यांचा वारसदार म्हणून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत.”

त्यांनी पुढे सांगितले की, आपण स्वतः निवडणूक लढवण्यास फारसे उत्सुक नाही; कारण त्यांना आपल्या भावाच्या हत्या प्रकरणाशी संबंधित न्यायालयीन बाबींची देखरेख करावी लागत आहे त्यामुळे आता देशमुखांच्या पत्नी निवडणूकीच्या रिंगणात उतरणार की अन्य कोणी इच्छूक उमेदवार हि निवडणूक लढवणार हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायातच्या निवडणूकिच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यामुळे आता गावातील गटांतटातील पुढार्याकडून आणि इच्छूक उमेदवारांकडून आकर्षक आशयाचे बॅनर बनवून सोशलमिडीयावर व्हायरल करत गावातील लोकांचे लक्ष वेधायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे आता गावचा पुढाकार कोण हाकणार की दिवगंत देशमुखांच्या पत्नी यांची बिनविरोध निवड होणार ? की निवडणूक होणार हे पाहणे महत्वपूर्ण ठरणार आहे.

धुरूळा उडण्याची शक्यता

गावच्या विकासापायी दिवगंत सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनीताई देशमुख ह्या निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने बिनविरोध निवणूक होऊन गटातटांतील इच्छूक राजकारणी पुढारी वर्गाचा धुरूळा होण्याची शक्यता गावातील नागरिकांकडून वर्तवली जात आहे.त्यामुळे आता संपूर्ण राज्याचे लक्ष या निवडणूकीकडे वेधले जात आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×