Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

प्रेमसंबधाला विरोध करुन तरुणाचा खून

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून

कोथरूडमधील घटना; १० जणांविरुद्ध गुन्हा

marathinews24.com

पुणे – नात्यातील तरुणीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध करुन नातेवाईकांना एका तरुणाला दांडक्याने मारहाण करुन त्याचा खून करण्यात आला. कोथरूड भागात मेगा सिटी इमारतीत ही घडली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांकडून १० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.नागेश संजय जाधव (वय २३, रा. जुनी वडारवाडी, मंजाळकर चौक, शिवाजीनगर) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. सुरेखा संजय जाधव (वय ४५, रा. जुनी वडारवाडी) यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली १० लाखांची
फसवणूक – सविस्तर बातमी

वृषाली अनिल शिंदे, सुनिता सुनिल शिंदे, जयश्री लक्ष्मण शिंदे, तुळशी योगेश शिंदे, गंगा संजय पवार, माणिक संजय पवार, सुनिल शिंदे, पोपट शिंदे, योगेश शिंदे, अनिल शिंदे (सर्व रा. मेगासिटी, एसएनडीटीजवळ, कोथरुड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागेश जाधव हा शिवाजीनगर येथील एका खासगी कार्यालयात ‘ऑफिस बॉय’ म्हणून काम करत होता. पौड फाटा चौक परिसरातील मेगा सिटी इमारतीत राहणाऱ्या एका तरुणीशी त्यचे प्रेमसबंध होते. प्रेमसंबधाला तरुणीच्या नातेवाईकांनी विरोध केला होता. शनिवारी (१४ मार्च) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास नागेश याच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून तरुणीच्या नातेवाईकांनी त्याला पौड फाटा चौक परिसरात असलेल्या मेगा सिटी इमारतीत बोलावून घेतले. त्यानंतर नागेश दुचाकीवरुन तेथे गेले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास आरोपींनी नागेशच्या आईच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. ’तुमच्या मुलाला आम्ही मारले आहे. दहा मिनिटात मुलाला घेऊन जा. अन्यथा त्याला आम्ही इमारतीतून फेकून दे”, अशी धमकी आरोपींनी नागेशच्या आईला दिली. त्यानंतर आरोपींनी मोबाइल क्रमांक बंद केला. नागेशची आई घाबरली. त्या कर्वे रस्त्यावरील मेगा सिटी इमारतीच्या आवारात आल्या.

त्यांनी रहिवाशांकडे विचारणा केली. तेव्हा नागेशला मेगा सिटी इमारतीच्या गच्चीवर आरोपी मारहाण करत असल्याचे आईने पाहिले. नागेश गंभीर जखमी झाला होता. त्याने आईला मारहणीबाब माहिती दिली. नागेशला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी त्याला घेउन त्या रिक्षाने निघाल्या. माझे ईश्वरी नावाच्या मुलीशी प्रेमसंबंध होते, असे नागेशने आईला सांगितले. ईश्वरीने त्याला मेगा सिटी परिसरात बोलावून घेतले. तिची आई, काकू, तसेच नातेवाईकांनी नागेशला दांडक्याने मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाल्याचे नागेशच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. नागेशला खासगी रुग्णलायातून ससून रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×