Breking News
Caste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडली

वाद सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच धक्काबुक्की

पाच जणांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भरधाव गाडी चालवल्यानंतर सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलिस अमंलदारांनाच धक्काबुक्की करणार्‍या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्ञानेश्वर सुंदर नटकले (वय २६), राहुल संजय साळवे (वय २३), रोहित अशोक डोंगरे (वय २७, सर्व रा. भिमनगर, विश्रांतवाडी, पुणे), सिध्दी कांबळे (वय २४, रा. साप्रस आंबेडकर सोसायटी, येरवडा) आणि हर्षल भोसले (वय २५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज बापुराव रणसिंग (वय ३२, रा. घोरपडी बाजार) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. हा प्रकार ३० ऑगस्ट रोजी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला.

शिक्रापूरमध्ये गुंडाचा एन्काऊंटर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने स्कुटी व अन्य दुचाकी भरधाव वेगात चालवत असताना त्यांनी गाडी सुरजच्या गाडीसमोर उभी करून त्यांचा मार्ग आडवला. नंतर सुरज यांना हाताने मारहाण कयन त्यांची चांदीची साखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी छेडछाडीची तक्रार दाखल करेन अशी दमदाटी आरोपींनी केली. नंतर शिवीगाळ करून आरोपींनी जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी तेथून जाणार्‍या अमंलदारांनी आरेापींना समजविण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी त्यांनाच धक्काबुक्की केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×