Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

विद्यापीठाच्या वसतीगृहातून विद्यार्थ्याच्या लॅपटाॅप चोरी

विद्यापीठाच्या वसतीगृहातून विद्यार्थ्याच्या लॅपटाॅप चोरी

चोरट्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहातून चोरट्यांनी एका विद्यार्थ्याचा ५० हजार रुपयांचा लॅपटाॅप चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका विद्यार्थ्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान- मंत्री चंद्रकांत पाटील – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाच्या आवारातील जी-३ वसतिगृहातील एका खाेलीत विद्यार्थी राहायला आहे. २३ सप्टेंबर रोजी वसतिगृहातील खोलीचा दरवजा उघडा होता. दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्याने आत प्रवेश केला. खोलीत कोणी नव्हते. चोरट्याने तरुणाचा ५० हजार रुपयांचा लॅपटाॅप लांबविला. लॅपटाॅप चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने पोलिसांकडे तक्रार दिली. यापूर्वी विद्यापीठाच्या आवारातील वसतिगृहातून विद्यार्थ्यांचे लॅपटाॅप, मोबाइल संच चोरीला जाण्याच्या घटना घडल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक अंकुश गडांकुश तपास करत आहेत.

बाणेरमध्ये घरफोडी

बाणेरमधील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी कपाटातील दीड लाख रुपयांचे साेन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण बाणेरमधील साई रेसीडन्सी सोसायटीत राहायला आहे. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. शयनगृहातील कपाट उचकटून दीड लाखांचे दागिने लांबविल्याचे बुधवारी (२४ सप्टेंबर) दुपारी उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक महेश थिटे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×