भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान- मंत्री चंद्रकांत पाटील

कोथरुड मधील ३००० पेक्षा जास्त कन्यांचे पूजन

marathinews24.com

पुणे – भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं असून, तिची पूजा केली पाहिजे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, मुलींना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले. प्रतिवर्षी प्रमाणे नवरात्रौत्सवानिमित्त चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकारातून कन्या पूजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात ३ हजार पेक्षा जास्त कन्यांचे पूजन करण्यात आले.

महिला सबलीकरण करण्यासाठी पुरुषांनी पुढे यावे – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार – सविस्तर बातमी

कार्यक्रमाच्या संयोजिका आणि पुणे शहर चिटणीस प्रा. डॉ. अनुराधा येडके, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य डॉ. संदीप बुटाला, भाजप कोथरुड मध्य मंडल महिला मोर्चा अध्यक्षा हर्षाली माथवड, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, वासंती जाधव, वृषाली चौधरी, छाया मारणे, ॲड. मिताली सावळेकर, राज तांबोळी, गिरीश खत्री, अजित जगताप, दीपक पवार, अनिता तलाठी, प्राची बगाटे, पूनम कारखानिस, अपर्णा लोणारे, सुजाता जगताप यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पाटील म्हणाले, भारतीय संस्कृतीत स्त्रीला प्रथम स्थान दिलं गेलं असून तिची पूजा केली जाते. आपण आजही बुद्धीची देवता सरस्वती, महालक्ष्मी, शक्तीस्वरुपा जगदंबेची नेहमीच पूजा करतो. ही सर्व स्त्रिचीच रुपे आहेत. पण पुरुषी मानसिकतेमुळे स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. कारण, स्वातंत्र्यपूर्व काळात परकीय आक्रमकांपासून स्त्रियांचे रक्षण करण्यासाठी तिला घरातच बंदिस्त केले. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तिला आपण पुन्हा बाहेर आणले नाही. चूल आणि मूल यामध्येच ती अडकली होती.

मात्र २०१४ पासून हे चित्र बदलते आहे. आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. तिला उच्च शिक्षणामध्ये प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारने आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींना फी माफीचा निर्णय घेतल्याने मुलींचे उच्च शिक्षणातील प्रमाण वाढते आहे. विविध विद्यापीठांमध्ये पीएचडी धारकांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे स्त्रियांना वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं गेलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोथरुड मतदारसंघात मानसी उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील मुलींच्या व्यक्तिमत्व विकासावर भरल दिला आहे. सुखदा उपक्रमाच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल कुटुंबातील गरोदर महिलांच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे. उद्योग सुरु करण्यासाठी महिला बचत गटांना मदत केली जात आहे, असे एकना अनेक उपक्रमाच्या माध्यमातून कोथरुड मधील महिलांना मदत केली जात आहे, अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×