चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – गोव्याला फिरायला गेलेल्या महिलेच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी ११ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना औंध परिसरात घडली असून, याप्रकरणी ३८ वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरून चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबवेवाडीत अल्पवयीन टोळक्याने केली वाहनांची तोडफोड, ९ जण ताब्यात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अनुजा देशपांडे (रा. विनोद अपार्टमेंट, संघवी केसर रोड, औंध) या १० मे ते १३ मे कालावधीत फिरण्यासाठी गोव्याला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरांनीदरवाजाद्वारे घरात प्रवेश करून ११ लाख २० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी शुक्रवारी (दि. १६) अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक पाटील करत आहेत.