लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने लंपास

लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने लंपास

चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – लोकमान्यनगरमध्ये घरफोडी, ७ लाखांचे दागिने लंपास – सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोकड असा सात लाख ३३ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना लोकमान्यनगर परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ज्येष्ठ महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिलेटरीमध्ये कामाला असल्याची केली बतावणी; महिलेला १ लाख ४० हजारांचा गंडा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्येष्ठ महिला नवी पेठेतील लोकमान्यनगर परिसरात राहायला आहेत. त्या शनिवारी (२६ जुलै) सदनिका बंद करुन बाहेर गेल्या होत्या. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने, रोकड असा सात लाख ३३ हजारांचा ऐवज लांबविला. रविवारी सकाळी घरफोडीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.

कात्रज भागातील आंबेगाव परिसरात एका सोसायटीतील सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी ८२ हजारांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना घडली. याबाबत एकाने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराची पत्नी रविवारी सकाळी सदनिका बंद करुन कामानिमित्त बाहेर गेली हाेती. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाटातील दागिने लांबवून चोरटा पसार झाला. पोलीस उपनिरीक्षक कळमकर तपास करत आहेत.

चोरट्यांकडून मिठाई चोरी

पद्मावती भागातील एका मिठाई विक्रीच्या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी रोकड, मिठाई असा ४३ हजारांचा मुद्देमाल चोरन नेल्याची घटना घडली. याबाबत एका मिठाई विक्रेत्याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसंनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराचे पद्मावती भागात मिठाई विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मिठाई विक्रीच्या दुकनाचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. गल्ल्यातील रोकड, तसेच मिठाईचे ट्रे चोरून चोरटे पसार झाले. पोलीस हवालदार अमोल पवार तपास करत आहेत. हडपसरमधील काळेपडळ परिसरात एका टायर विक्री दुकाानाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी ५५ हजारांचे टायर चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका व्यावसायिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार प्रवीण काळभोर तपास करत आहेत.

डाॅक्टर महिलेच्या सदनिकेतून ऐवज लांबविला

विश्रांतवाडीत एका डाॅक्टर महिलेच्या सदनिकेचे कुलूप तोडून चोरट्यांनी दागिने आणि रोकड असा सात लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली. याबाबत एका डाॅक्टर महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला विमानतळ रस्त्यावरील एका सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी सदनिकेचे कुलूप तोडले. कपाट उचकटून चोरट्यांनी दागिने् आणि रोकड लांबविली. सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×