Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पुणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा तस्करांविरूद्ध कारवाई

पुणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा तस्करांविरूद्ध कारवाई

१२ किलो गांजा जप्त

marathinews24.com

पुणे – पुणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा तस्करांविरूद्ध कारवाई – स्थानिक गुन्हे शाखेने विविध ठिकाणी अवैध धंद्यावर कारवाईचा बडगा उगारला. तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत १२ किलो गांजासह साडेतीन लाखांचा ऐवज जप्त केला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. शुभम शंकर मोहीते (वय २९) विजय केमराज काळे (वय २९ रा. टाकळीहाजी ता. शिरूर) रफीक चांद शेख (वय ३६ रा. गुलमोहर अपार्टमेन्ट बुरूड आळी शिरूर)रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे (वय ३३ रा. कामाठीपुरा शिरूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

घरफोडी करणारा चोरटा मध्य प्रदेशातून अटकेत – सविस्तर बातमी 

अवैध धंद्याविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी दिले आहेत. त्यानअुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ हे २५ जुलैला पथकासह शिरूरमध्ये पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी दोघे गांजा तस्कर आमदाबाद फाटा परिसरात येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, उपनिरीक्षक दिलीप पवार यांना सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आरोपी मोहिते आणि काळे यांना ताब्यात घेउन त्यांच्याकडून ४ किलो १८५ ग्रॅम गांजा, दुचाकी जप्त केली. दुसर्‍या कारवाईत शिरूर गावचे हद्दीत बुरूड आळीत रफिक शेख हा घरातून गुटखा तंबाखू, पानमसाला विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी शेखच्या घरात छापा टाकून ३ लाख ५६ हजारांचा गुटखा जप्त केला.

पुणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा तस्करांविरूद्ध कारवाई

पथकाने शिरूरमधील मंगलमुर्ती नगरात गांजा तस्कर रमेश उर्फ रमन रामभाऊ खराडे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख २० हजार रूपये किंमतीचा ८ किलो गांजा जप्त केला. तीन ठिकाणी केलेल्या कारवाईत पोलिसांनी १२ किलो गांजा जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस अधिक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, एलसीबी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे एपीआय कुलदीप संकपाळ, एपीआय दिपक कारंडे, उपनिरीक्षक दिलीप पवार,उपनिरीक्षक सागर शेळके, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, नाथसाहेब जगताप, नितीन सुद्रीक भाग्यश्री जाधव, सागर धुमाळ, सचिन भोई यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×