Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

घरफोडी करणारा चोरटा मध्य प्रदेशातून अटकेत

घरफोडी करणारा चोरटा मध्य प्रदेशातून अटकेत

लोणी काळभाेरमधील घरफोडीचा गुन्हा उघड

marathinews24.com

पुणे – घरफोडी करणारा चोरटा मध्य प्रदेशातून अटकेत – लोणी काळभोर भागागतील कदमवाक वस्ती येथे घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्याला पोलिसांनी मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक केली आहे. अटक केलेल्या चोरटयाविरुद्ध महारााष्ट्र , तसेच मध्यप्रदेशात घरफोडी, चोरी आणि जबरी चोरीचे १५ गंभीर गुन्हे दाखल आहेत. प्रतीक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. खांडवा, मध्यप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एकाने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

नांदण्यास नकार दिल्याने पत्नीचा खून, लोहगावमधील घटना – सविस्तर बातमी 

तक्रारदार लोणी काळभोर भागात राहायला आहेत. त्यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. विधीसाठी ते १२ जुलैला कुटुंबीयांसोबत बार्शी येथे गेले होते. निडकर याने तक्ररादाराच्या घराचे कुलूप तोडले. घरातील सोन्याचे दागिने लांबवून निडकर पसार झाला. १४ जुलै रोजी ते गावाहून परतले. तेव्हा घराचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर तक्रारदाराने पोलील ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.
लोणी काळभोर पोलिसांनी तपास सुरू केला.

सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तांत्रिक विश्लेषणात आरोपी मध्य प्रदेशात पसार झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसंच्या पथकाने निडकर याला मध्य प्रदेशातील खांडवा येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडून लोणी काळभोरमधील घरफोडीच्या गुन्ह्याील दागिने, रोकड, मोबाइल असा ६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×