Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

ट्रकच्या धडकेत तरूणी ठार, ट्रव्हल्सने तरूणाला उडविले

ट्रकच्या धडकेत तरूणी ठार, ट्रव्हल्सने तरूणाला उडविले

लोणीकंद, वाघोलीत अपघात

marathinews24.com

पुणे – ट्रकच्या धडकेत तरूणी ठार, ट्रव्हल्सने तरूणाला उडविले – शहरातील दोन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तरूणीसह दुचाकीस्वार तरूण ठार झाला आहे. हे अपघात २७ जुलैला लोणीकंद, वाघोली परिसरात घडले आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार वाहन चालकांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पुणे जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेकडून गांजा तस्करांविरूद्ध कारवाई – सविस्तर बातमी 

भरधाव ट्रक चालकाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार सहप्रवाशी तरूणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात २७ जुलैला रात्री दोनच्या सुमारास पुणे-नगर रस्त्यावरील लोणीकंदनजीक इंडियन पेट्रोल पंपाजवळ घडला आहे. मीनाक्षी शिवशंकर जाधव (वय १९, रा. शिक्रापूर) असे ठार झालेल्या तरूणीचे नाव आहे. याप्रकरणी तरूणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार तरूण आणि त्याच्या मामाची मुलगी मीनाक्षी हे २७ जुलैला लोणीकंद परिसरातून दुचाकीवर जात होते. त्यावेळी भरधाव मोटार चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. खाली पडल्यामुळे गंभीररित्या जखमी झालेल्या मीनाक्षीचा मृत्यू झाला असून, तक्रारदार जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अर्जुन थेरे तपास करीत आहेत.

ट्रॅव्हल्स बसचालकाने दुचाकीस्वाराला पाठीमागून ठोस दिल्यामुळे झालेल्या अपघातात तरूण ठार झाला आहे. हा अपघात २७ जुलैला सकाळी साडेनउच्या सुमारास वाघोलीतील कटकेवस्ती विठ्ठलवाडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी अज्ञात ट्रॅव्हल्स चालकाविरूद्ध वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन रोहिदास जाधव वय २० रा. पेरणेगाव असे ठार झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याच्या भावाने फिर्याद दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक राघू तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×