Breking News
‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्पPune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन

रिक्षाचालकासह साथीदारांनी तरूणाला लुटले

रिक्षाचालकासह साथीदारांनी तरूणाला लुटले

रेसकोर्स टर्फ क्लब रेसकोर्स परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – रिक्षाची वाट पाहत थांबलेल्या तरूणाला इच्छितस्थळी सोडण्याची बतावणी करीत टोळक्याने त्यांना गाडीत बसविले. काही अंतरावर गेल्यानंतर तरूणाला शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याची घटना रेसकोर्स टर्फक्लब परिसरात घडली आहे. रिक्षा चालकासह साथीदारांनी प्रवाशाला धाक दाखवून २८ हजारांचा ऐवज लुटला आहे. अवधुत विजय माने (वय २४, रा. शिवनेरी कोऑपरेटिव्ह सोसायटी, बेलापुर नवी मुंबई) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ट्रकच्या धडकेत तरूणी ठार, ट्रव्हल्सने तरूणाला उडविले – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार माने हे नवी मुंबई बेलापूरमधून पुणे स्टेशन परिसरात आले होते. पहाटे सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास ते पुणे रेल्वेस्टेशन समोर इच्छितस्थळी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत थांबले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने माने यांना कुठे जायचे आहे अशी विचारणा केली. मी तुम्हाला सोडतो असे सांगून रिक्षात बसविले. त्यावेळी दोन अनोळखी व्यक्तीही त्या रिक्षात बसल्या होत्या. रेसकोर्स टर्फ क्लब रेसकोर्स परिसरात गेल्यानंतर रिक्षातील दोघांनी माने यांना शस्त्राचा धाक दाखवून त्यांचे हात पकडले. नंतर त्यांच्या खिशातील मोबाईल व कानातील बाळी काढून घेतले. चोरी करून चोरटे पुन्हा पुणेस्टेशनच्या दिशेने निघून गेले. चोरट्यांनी २८ हजार ७०० रूपयांचा ऐवज चोरी केला आहे.

तरूणांना लुटल्याप्रकरणी एकाला अटक

कामावरून सुटल्यानंतर घरी निघालेल्या दोन मित्रांना रिक्षा चालकाने सेव्हनलव्ह चौकात मारहाण करून मोबाईल, रोकड जबदरस्तीने चोरून नेली होती. याप्रकरणी खडक पोलिसांनी एकाला अटक केली आहे. सलीम हसन शेख (२५, रा. काशीवाडी, भवानी पेठ, पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे. राधे सिंधगोपाल सिंह (३०, रा. लोहीयानगर) यांनी फिर्याद दिली आहे. तक्रारदार राधे सिंह हे त्याचा मित्र मुन्ना सिंह याच्यासोबत दि. २६ जुलैला सातच्या सुमारास कामावरून घरी पायी जात होते. शेखने सेव्हनलव्ह चौकात दोघांना पकडून मारण्याची धमकी देवून त्यांच्याकडील मोबाईल, रोकड चोरून आरोपी रिक्षातून आरोपी पळून गेले होते. आरोपींचा शोध धेत त्यातील एकाला खडक पोलिसांनी अटक केली.

भरदिवसा दुचाकीस्वाराची सोन्याची चैन हिसकावली

पुणे – भरदिवसा दुचाकीस्वार तरूणाचा पाठलाग करून चोरट्यांनी संबंधित तरूणाच्या गळ्यातील १ लाख ५० हजारांची सोन्याची चैन हिसकावून नेली आहे. ही घटना २७ जुलैला दुपारी सव्वा चारच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील वडगाव ब्रीजसमोरील सोमेश्वरम हॉटेलजवळ घडली आहे. याप्रकरणी दत्तनगरात राहणार्‍या ३० वर्षीय तरूणाने सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघा चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण दत्तनगर परिसरात राहायला असून, २७ जुलैला दुपारी सव्वा चारच्या सुमारास वडगाव ब्रीजसमोरील सोमेश्वरम हॉटेलजवळून दुचाकीवर जात होता. त्यावेळी तिघा दुचाकीस्वार चोरट्यांनी तक्रारदार तरूणाचा पाठलाग करून गाठले. त्याला धमकावून गळ्यातील दीड लाखांची सोन्याची चैन हिसकावून नेली. तरूणाने आरडाओरड करेपर्यंत दुचाकीस्वार चोरटे सुसाट पसार झाले. याप्रकरणी आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक भूषण साळुंखे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×