खात्रीशीर नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने तरूणाला १५ लाख ३४ हजारांचा ऑनलाईन गंडा
marathinews24.com
पुणे – ट्रेंडींग स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास खात्रीशीर नफा मिळवून देण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १५ लाख ३४ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ६ डिसेंबर २०२४ ते २१ जानेवारी २०२५ कालावधीत धायरीत घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बिबवेवाडीत जुन्या वादातून तरूणावर वार, अल्पवयीन टोळके ताब्यात – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण कुटूंबियासह धायरीत राहायला असून, ६ डिसेंबरला सायबर चोरट्यांनी त्यांना संपर्क केला. ट्रेडींगमध्ये स्टॉक मार्वेâटमधून खात्रीशीर नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांना दाखविले. त्यानंतर ऑनलाइन लिंक पाठवून संबंधित अॅप्लीकेशन फोनमध्ये डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर ऑनलाईनरित्या तब्बल १५ लाख ३४ हजार रूपये वर्ग करण्यास भाग पाडले. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तरूणासोबत संपर्क बंद केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस तपास करीत आहेत.