Breking News
विशाल छुगेरा प्रॉपर्टीजतर्फे चॅनेल पार्टनर्स संमेलनाचे आयोजनवाघोलीत भव्य कष्टकरी शेतकरी महिला परिषद संपन्नएसएनडीटी मध्ये  महिला दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ पुणे संस्कृती तर्फे प्रेरणादायी कार्यक्रम संपन्नडी.लिट.मुळे स्वयंपूर्ण गोवे उपक्रमाला बळ-मुख्यमंत्री प्रमोद सावंतकारवाईची भीती दाखवून पावणेपाच लाखांची फसवणूकग्रीन कॉरिडॉरमुळे दात्याचे फुफ्फुस वेळेत डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये; ५०वे हृदय-फुफ्फुस प्रत्यारोपण यशस्वीस्वारगेट परिसरात बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगावादातून सोसायटीतील वाहने पेटवून देणारा गजाआडउपाहारगृहातील रोखपालाकडून रोकड लंपासमुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वाहनावर ट्रक आदळून चालकाचा मृत्यू

रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने १६ जणांची फसवणूक

रेल्वेत नोकरीच्या बहाण्याने १६ जणांची फसवणूक

३५ लाख ५३ हजारांचा गंडा

marathinews24.com

पुणे – रेल्वेत शासकीय नोकरीला लावण्याच्या बहाण्याने चौघाजणांनी १६ जणांची फसवणूक केली आहे. आरोपींनी संबंधित तक्रारदारासह इतरांकडून मिळून तब्बल ३५ लाख ५३ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना १७ जुलै २०२५ ते मार्च २०२६ कालावधीत धनकवडीतील कामना इमारतीत घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून साडेआठ लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे धनकवडीत राहायला असून, काही महिन्यांपुर्वी त्यांची आरोपींसोबत ओळख झाली होती. त्याचा गैरफायदा घेत आरोपींनी तक्रारदाराच्या मुलाला रेल्वेत नोकरीला लावतो, अशी बतावणी केली होती. त्यासाठी धनकवडीतील कामना इमारतीत कार्यालयही दाखवले होते. विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने संबंधितांना पैसे दिले. त्यासोबत इतर १५ जणांनीही आरोपींच्या मागणीनुसार पैसे दिले होते. मात्र, रेल्वेत नोकरी न लावता चौघांनी त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक सोनाली कथले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×