इंडेक्स ट्रेडींगची हाव पडली २३ लाखांना

इंडेक्स ट्रेडींगची हाव पडली २३ लाखांना

सायबर चोरट्यांचा तरूणीला गंडा

marathinews24.com

पुणे – इंडेक्स ट्रेडींगच्या माध्यमातून भरपूर नफा कमवून देण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी तरूणीला तब्बल २२ लाख ६७ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना एप्रिल ते १० मे २०२५ कालावधीत लोहगावमध्ये घडली आहे. याप्रकरणी अंकिता सदानंद (वय ३२, रा. लोहगाव) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेलीग्रामधारकासह इतरांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विश्रामबाग परिसरात घरफोडी, ११ लाखांचा ऐवज चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अंकिता लोहगावमध्ये राहायला असून, कंपनीत कामाला आहे. एप्रिल २०२५ मध्ये सायबर चोरट्यांनी तिला टेलीग्रामवर मेसेज पाठविला होता. इंडेक्स ट्रेडींगच्या माध्यमातून भरपूर नफा कमवून देण्याचे आमिष दाखविले. सायबर चोरट्यांनी अंकिताचा विश्वास संपादित करून घेत तिला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. एक महिन्यांत जवळपास २३ लाख रूपये गुंतवणूक करूनही अंकिताला नफा मिळाला नाही. त्यामुळे तिने रक्कम माघारी मागण्यास सुरूवात केली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तिच्यासोबत संपर्क बंद करीत फसवणूक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक आशालता खापरे तपास करीत आहेत.

ट्रेडींगद्वारे नफ्याचे आमिषाचा हव्यास नकोच

नागरिकांनो तुम्हाला जर कोणी ट्रेडींगद्वारे जादा नफा देण्याचे आमिष दाखवत असल्यास त्यापासून दूर राहणे आवश्यक आहे. अन्यथा सायबर चोरट्यांकडून तुमचा विश्वास संपादित करून गुंतवणूकीला भाग पाडले जाईल. त्यानंतर अवघ्या काही दिवसांत लाखो रूपयांची गुंतवणूक करून घेत तुमची फसवणूक होउ शकते. त्यामुळे शेअर मार्वेâट गुंतवणूक, ट्रेडींगद्वारे जादा नफा, अमुक-तमूक गोष्टींवर जादा परताव्याचे आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन पुणे सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top